चंद्रपूर-गडचिरोलीतील दारू तस्करांना काही मंत्र्यांचा आशीर्वाद; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

चंद्रपूर-गडचिरोलीतील दारू तस्करांना काही मंत्र्यांचा आशीर्वाद; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप
Published on
Updated on

गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये दारू बंदी असताना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दारूचा महापूर वाहत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दारू तस्करांना राज्यातील मोठ्या मंत्र्यांचा आशीर्वाद आहे. या आशीर्वादातून या दारू तस्करांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

कॉंग्रसेच्या जनसंघर्ष यात्रेला आज गडचिरोली येथून सुरूवात झाली. यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रचे सहप्रभारी आशीष दुआ, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार आशीष देशमुख, माजी आमदार सेवक वाघाये, कॉंग्रेसचे नेते किशोर गजभिये, अनंतराव घारड, रामकिशन ओझा, शाम उमाळकर, प्रकाश सोनवणे, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, अतुल लोंढे, सुरेश भोयर, पंकज गुडेवार, अमर वराडे आदी उपस्थित होते.

गडचिरोली येथून या यात्रेला सुरूवात करताना चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारू तस्करांना राज्यातील मंत्र्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप करून ते म्हणाले, दारू तस्कर आता पोलिसांना ठार करू लागले आहेत. एवढी हिंमत दारू तस्करांना कुणी दिली? कोणत्या मंत्र्याचे आशीर्वाद या गुंडांना आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रिश आत्राम यांना जिल्ह्यात शोधावे लागत असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी काळातील विकास कामे फडणवीस सरकारने थांबविली असून विकासापासून जनतेला दूर ठेवले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने 1999 पासून 2014 पर्यंत विकासाची अनेक योजना राज्यात सुरू होत्या. या योजनांतून राज्यातील जनतेलाच फायदा मिळणार होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर कॉंग्रेसच्या केंद्र व राज्यातील योजनांवर वरवंटा फिरविण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी 100 वर कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com